महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्यादित लातूर (MNS Bank) ची स्थापना 18 जानेवारी 1997 रोजी थोर नेते शिक्षण तज्ञ सामाजिक कार्यकर्ते तसेच हितचिंतक माजी आमदार श्री शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या अध्यक्षते खाली तात्कालीन मुख्यमंत्री मा. ना. मनोहर जोशी मा. खा. शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्या हस्ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करण्यात आली.
या मागील 26 वर्षापर्यंत सन 1997 ते 2022 या काळामध्ये बँकेच्या चार शाखा कार्यरत आहेत तसेच एक कॉर्पोरेट ऑफिस व एक हेड ऑफिस कार्यरत आहे. येत्या काळामध्ये बँकेचे पाच शाखेचे मंजुरी प्रस्ताव आहे.
2022 अखेर 21948.19 कोटी ठेवींचे उद्दिष्टे काढले असून येत्या आर्थिक वर्षात बँकेने 300 कोटी ठेवींचा टप्पा पार करण्याचा संकल्प केला आहे.
तंत्रज्ञान:
आधुनिक तंत्रज्ञान लक्षात घेता बँकेने बँकिंग क्षेत्रातील होत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून MNS ऍडव्हान्स आयटी सेंटरची स्थापना करून व्यवसायात पारदर्शकता व गतिमानता अधिक प्रमाणात आणली आहे. ग्राहकांच्या सेक्युरिटी ची व्यवस्था तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकासाकडे झेप घेताना बँकेने गेल्या सहा वर्षात Core Banking System(CBS) प्रणाली कार्यान्वित केले आहे. बँकेच्या ग्राहकांना तंत्रज्ञान आधारित विविध सेवा उपलब्ध करून देण्याचा बँकेचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. बँकेचे मुख्य कार्यालय व सर्व शाखांचे संगणकीकरण (Data centre) एस एम एस बँकिंग नेट बँकिंग विमा व्यवसाय फ्रांकिंग आरटीजीएस एनईएफटी ने जलद ट्रान्सफर अशाच विविध सेवा व सुविधा चालवते.
बँकिंग प्रणाली दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. ग्राहकांना कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सेवा देण्याकरिता 2023 यावर्षी बँकेने Rupay ATM 🏧 डेबिट कार्ड व मोबाईल ॲप mobile app सुविधा सुरू केली आहे. सर्व खातेदारांची व्यवहाराची माहिती त्यांना एसएमएस द्वारे देण्यात येत आहे.
पुरस्कार
आपल्या बँकेचे कार्य पाहता आतापर्यंत 6 विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
1) इंटरनॅशनल अचीवर डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मार्फत नॅशनल पुरस्काराने सन्मानित
2) इंडियन इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट अँड रिसर्च ऑर्गनायझेशन न्यू दिल्ली यांच्यामार्फत बँकिंग एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
3) दि महाराष्ट्र सहकारी बॉक्स असोसिएशन लिमिटेड मुंबईच्या वतीने उत्कृष्ट नागरी पुरस्कार.
4) एम एम एस बँकेचे संस्थापक चेअरमन लोकनेते माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर यांच्या बँकिंग क्षेत्रातील सामाजिक कार्याबद्दल अनमोल व उत्कृष्ट कार्य बद्दल सह्याद्री उद्योग समूहांच्या वतीने अर्थरत्न राज्यस्तरीय पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
5) राज्य बँक असोशियनचा पद्मभूषण वसंत दादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
6) ऑल इंडिया बिजनेस कम्युनिटी अँड फाउंडेशन मार्फत नागरी सहकारी बँक गौरव पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आले
” ISO9001.2000″ हे मानांकन 2008 मध्ये प्राप्त झाले आहे.
बँक सतत ग्राहकांचे विश्वास जपते व खातेदारांना ठेवी सुरक्षितता प्रदान करते
Audit मध्ये अ वर्ग मिळतो.
बँकेच्या खातेदार ठेवीदार सभासद हितचिंतक तसेच संचालक मंडळातील सहकारी यांनी माझ्यावर विश्वास दाखवला व बँकेच्या कामात मला सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
धन्यवाद!
आपला स्नेहांकित,
माजी आ. शिवाजीराव पाटील कवेकर
संस्थापक अध्यक्ष.
we promise to be your reliable financial partner, providing secure and convenient banking experiences that exceed expectations. Our dedicated team of professionals is committed to understanding your unique financial goals and aspirations
our mission is to be the leading financial institution in Maharashtra, dedicated to enhancing the financial well-being of our customers and the communities we serve. We are committed to delivering personalized and innovative banking solutions.
At Maharashtra Nagari Sahakari Bank Latur, we envision a future where every individual, family, and community in Maharashtra experiences financial empowerment and inclusivity. Our vision is not just about being a successful financial institution; it is about making a significant positive impact on the lives of our customers and the communities we serve.